भाजपा उत्तर मुंबईचा निर्धार: विकासासाठी कटिबद्ध_

उत्तर मुंबईचा निर्धार: भाजपाची संघटनात्मक बैठक, विकासासाठी कटिबद्ध_

Posted by Niilesh waghela 

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या उत्तर मुंबई जिल्ह्याची संघटनात्मक बैठक आज कांदिवली पश्चिम येथील समता क्रिडा भवन येथे पार पडली. ही बैठक केवळ एक औपचारिक मेळावा नव्हता, तर संघटनेच्या भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण विचारमंथन होते.

बैठकीत खासदार क्रीडा महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन, मुंबई वचननाम्यातील आश्वासनांची पूर्तता, महिला संमेलनाद्वारे नारीशक्तीचे संघटन, तसेच आगामी कार्यक्रम, जनसंपर्क अभियान आणि बूथ स्तरापर्यंत संघटन बळकटीकरण यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या प्रसंगी आमदार योगेश सागर, आमदार श्रीमती मनीषा ताई चौधरी, जिल्हाध्यक्ष दिपक (बाळा) तावडे, माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, जिल्हा सरचिटणीस निखिल व्यास, बाबा सिंग, योगिता पाटील, रामकृष्ण बेलवलकर, मिडिया प्रभारी नीला बेन कनुभाई राठोड सोनी यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, विधानसभा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसिद्धी प्रमुख उत्तर मुंबई, नीला कनुभाई राठोड सोनी यांनी सांगितले की, “आगामी आव्हानांसाठी सज्ज, विकासासाठी कटिबद्ध” या भूमिकेतून ही बैठक झाली. भाजपाचे नेतृत्व आगामी निवडणुका, सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्क अभियानांसाठी सज्ज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Comments

Popular posts from this blog

Beware, non-veg milk is coming

Neela Rathore Soni re-elected as BJP's publicity chief

Notebooks to cost 20% more